MY BELGAUM CHEMISTS

Tuesday, January 14, 2014

INTERNATIONAL KITE FESTIVAL AT BELGAUM KARNATAKA........

परिवर्तनतर्फे १८ ते २१ जानेवारी २०१४ दरम्यान आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन

abhay patil press meet
बेळगाव,दि . १४:परिवर्तन परिवारातर्फे दि . १८ ते २१ जानेवारी २०१४  दरम्यान आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक माजी आमदार अभय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली . नानावाडी ,सावगाव मार्गावरील माळावर होणाऱ्या  आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात देशातील आणि परदेशातील पतंगबाज सहभागी होणार आहेत .
दि . १८ रोजी पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते सकाळी १०. ३० वाजता आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे उदघाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुरेश अंगडी ,जिल्हाधिकारी एन . जयराम ,उद्योजक राम भंडारी उपस्थित राहणार आहेत .
आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे  एरो मॉडेलिंग शो ,क्र्याकर शो  आणि नाईट काईट फ्लाइंग हे आकर्षण ठरणार आहे . पतंग उडविण्याच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी मुले तरुण ,महिला आणि कुटुंबांसाठी दि . २० आणि २१ जानेवारी रोजी पतंग उडविण्याची संधी महोत्सवात देण्यात येणार आहे .
आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाच्या निमित्ताने परिवर्तन परिवारातर्फे दि . २० जानेवारी रोजी आंतरराज्य युथ फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून उदघाटन समारंभाला खासदार रमेश कत्ती ,व्ही टी यु चे उपकुलगुरू महेशप्पा ,डॉ . एम . व्ही . जाली ,उद्योजक जयंत हुंबरवाडी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत . कर्नाटक ,महाराष्ट्र आणि गोव्यातील २८ हून अधिक कॉलेजचे विद्यार्थी युथ फेस्टिवलमध्ये सहभागी होणार आहेत .
 एड्स जागरुकता ,महिला सबलीकरण ,प्लास्टिकचा वापर टाळा याचा संदेश देऊन समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी  पथनाट्याचे आयोजन करण्यात आले असून  दि . १६ जानेवारी रोजी आर. पी . डी . कॉर्नर येथे पथनाट्याचे उदघाटन महानगरपालिका आयुक्त रवीकुमार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .
पत्रकार परिषदेला अभय पाटील यांच्यासमवेत अशोक नाईक आणि परिवर्तन परिवाराचे सदस्य उपस्थित होते .
- See more at: http://indiareflects.com/marathi/?p=31922#sthash.8HKtkXhH.2pI3Pp16.dpuf

No comments:

Post a Comment