परिवर्तनतर्फे १८ ते २१ जानेवारी २०१४ दरम्यान आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन
बेळगाव,दि . १४:परिवर्तन परिवारातर्फे दि . १८ ते २१ जानेवारी २०१४ दरम्यान आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक माजी आमदार अभय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली . नानावाडी ,सावगाव मार्गावरील माळावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात देशातील आणि परदेशातील पतंगबाज सहभागी होणार आहेत .
दि . १८ रोजी पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते सकाळी १०. ३० वाजता आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे उदघाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुरेश अंगडी ,जिल्हाधिकारी एन . जयराम ,उद्योजक राम भंडारी उपस्थित राहणार आहेत .